नुकत्याच पार पडलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा काल निकाल जाहीर झाला. यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. यावेळी तब्बल 25 वर्षांची सत्ता ठाकरेंच्या हातातून गेल्यामुळे त्यांना आधीच मोठा फटका बसला होता. अशातच मुंबईतील पराभवानंतर ठाकरे गटासाठी आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे शुक्रवारी 16 जानेवारीला रात्री 10 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
काल पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालादरम्यान ठाकरे गटाला पराभव पत्कारावा लागला, त्यानंतर काही क्षणातचं नीला देसाई यांना हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे आधीच पराभवामुळे शांतता पसरलेल्या ठाकरेंच्या पक्षाला दुहेरी धक्का बसला आहे. ज्या काळात राजकारणात महिलांचा वावर अत्यंत मर्यादित होता, अशा कठीण काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नीला देसाई यांच्यावर विश्वास टाकला होता.
बाळासाहेबांच्या शब्दाखातर मैदानात उतरणाऱ्या नीला देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. तसेच त्यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून काम केलं होतं. त्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी एकनिष्ठ राहिल्या होत्या. दरम्यान त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नीला देसाई यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.