राज्यात सध्या स्वयंघोषित बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्य करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे सुमारे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ व्हायरल झाले असल्याची धक्कादायक माहिती SIT च्या बैठकीतील पोलीस सूत्रांनी दिली आहे. महिलांवर तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि अश्लील कृत्ये केल्याचे खरातचे अनेक व्हिडिओ समोर आले असून या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा खरात प्रकरणावर मीम्सच्या माध्यमातून विनोद व्हायरल करत असताना अनेकांकडून त्यासंबंधी व्हिडिओ फोटोमध्ये खरातसोबत असलेल्या पीडितांचे चेहरे देखील व्हायरल होत होते. यामुळे पीडित महिलांची मोठ्या प्रमाणात बदनामी होत होती.
हेही वाचा- Ashok Kharat Case : लैंगिक शोषणापलीकडेही खराचे अनेक घोटाळे! बँकेत घातले होते अनेक व्यवहारीक गंडे; बँक मॅनेजरने दिली कबुली
यामुळे भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. खरात प्रकरणातील आठ ते नऊ पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडित महिला घरातच नैराश्याच्या सावटात एकट्याच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये तसेच पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देत न्याय मिळवून देण्याच आवाहन केलं आहे. पीडित महिलांची विशेष पथकाकडून अज्ञातस्थळी चौकशी तसेच या प्रकरणात होणारा मानसिक त्रास बघता न्यायाच्या दृष्टीने प्रकरण हाताळावे असा सल्ला दिला आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांकडे धाव घेतल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. पीडितांच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटला शेअर किंवा फॉरवर्ड करू नये असं आवाहन देत पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करत सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर नजर ठेवली जाते. तसेच अशोक खरात प्रकरणात पीडितांचे फोटो, व्हिडिओ किंवा त्यांची ओळख उघड करणारा कोणताही मजकूर व्हायरल केल्यास कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.