पुण्यात गोदामाला भीषण आग

पुण्यात गोदामाला भीषण आग

पुण्यात हडपसरमधील सातव नगर परिसरात स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल एरीयामध्ये भीषण आग लागली आहे.

या भागातील एका कागद पुठ्ठा गोडाऊनमध्ये भीषण आग लागली आहे.

या गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

या आगीत मोठ्या प्रमाणावर गोडाऊनमधील सामानाचं नुकसान झालं आहे.

अग्निश्मन दलाकडून आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version