ट्रक आणि चारचाकीची धडकेत भीषण अपघात

ट्रक आणि चारचाकीची धडकेत भीषण अपघात

पुणे मुंबई द्रुतगतीमार्गावर किलोमीटर 82.00 दरम्यान, उर्से टोलनाक्याजवळ आढे गावाच्या हद्दीत शुक्रवारी एक भीषण अपघात घडलाय. एका मालवाहतूक ट्रकला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली, ज्यात कारमधील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. याच एक्सप्रेस हायवेवर चौघा जनांचा मृत्यू झाला होता आणि शुक्रवारी पुन्हा पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर मृत्यू झालेला आहे. ही कार मुंबईवरून पुण्याकडे जात होती. त्याच्यामुळे एक्सप्रेस वे वरील हे अपघातांचे सत्र कधी थांबणार याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.

अपघातात अर्धी कार ट्रकखाली गेली. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या ट्रकचा काही बिघाड झाल्यामुळे तो रस्त्यालगत उभा करण्यात आला होता. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या कारने या ट्रकला धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. तर भरधाव कारवरील चालकाचा ताबा सुटल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

विजय विश्वनाथ खैर, रा.सातारा असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून इतर दोन जणांची ओळख पटवणे सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version