Farmers will Get Diesel: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, शेतीकामासाठी मिळणार डिझेल पण…; अटी लागू

या सगळ्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामं खोळंबली आहे.
Farmers will Get Diesel: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा, शेतीकामासाठी मिळणार डिझेल पण…; अटी लागू

आखाती देशातील युद्धामुळे सध्या देशावर इंधन तुटवड्याचं सावट आहे. पेट्रोल, डिझेल तसेच नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच इंधनाचा तुटवडा असल्याच्या अनेक बातम्यादेखील समोर येत आहेत. या सगळ्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असलेला दिसून येत आहे. शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्याने शेतीची कामं खोळंबली आहे.

 टॅक्टर, शेती पंप यासह इतर कामासाठी डिझेलची गरज आहे. पण डिझेलच्या तुटवड्यामुळे संकट ओढावले आहे.पेट्रोल पंपावर डिझेल येताच शेतकऱ्यांची एकच गर्दी उसळली आणि एकच गोंधळ उडाल्याचे निदर्शनास आले आहे. अशातच आता शेतकऱ्यांना रोजच्या शेती मशागतीसाठी डिझेलचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मशागतीच्या कामासाठी 100 लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल : 
समोर आलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना दररोज शेती मशागतीच्या कामासाठी 100 लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचा आदेश पुरवठा विभागाने परभणीमध्ये दिला आहे. पूर्व मशागत आणि शेती कामांची अडचण बघता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुरवठा विभागाने आदेश काढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

अटींची करावी लागणार पूर्तता: 
पण त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. पेट्रोल पंपवर आधार कार्ड सातबारा दाखवल्यास शेतकर्‍यांना शंभर लिटर पर्यंत पेट्रोल डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिला आहे. पेट्रोलियम नियम आणि मानकानुसार जाड प्लास्टिक किंवा धातूच्या कॅन मध्ये इंधन उपलब्ध करून देण्याचे आदेशही पुरवठा विभागाने दिले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version