प्रसिद्ध निसर्गकवी ना.धों.महानोर यांचं निधन

प्रसिद्ध निसर्गकवी ना.धों.महानोर यांचं निधन

पळसखेड, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झालंय. ना. धो. महानोर हे ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासुन ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी पळसखेड या त्यांच्या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ना. धों. महानोर यांचा परिचय: 

१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेले ना. धों. महानोर गेली ६० वर्षाहून अधिक काळापासुन साहित्यक्षेत्रात कार्यरत होते. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.

महानोरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. महानोर सगळ्यांत थोरले. पळसखेडला प्राथमिक शिक्षण झालं. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी पुढील शिक्षणासाठी ते ८-१० कि.मी. अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले.

शेंदुर्णीच्या शाळेतच त्यांची कवितेशी सुरुवातीला ओळख झाली. आणि त्यांना कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामं केली.

मॅट्रिक झाल्यानंतर महानोर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात आर्ट्स शाखेत दाखल झाले. परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणं भाग पडलं. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना मुलाची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले. पण याच शेतीने अथवा निसर्गाने त्यांच्यातला कवीला प्रेरणा दिली. ना. धों. यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी वाचक-रसिकांना वेड लागलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version