Amol Mitkari: भोंदू बाबा अशोक खरात आणि ‘VSR’ कंपनीचे कनेक्शन काय? मिटकरींनी उपस्थित केले गंभीर सवाल; राजकारणात मोठी खळबळ

धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याच्या आरोपावरून भोंदू बाबा अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Amol Mitkari: भोंदू बाबा अशोक खरात आणि ‘VSR’ कंपनीचे कनेक्शन काय? मिटकरींनी उपस्थित केले गंभीर सवाल; राजकारणात मोठी खळबळ

मुंबई: धर्माच्या नावाखाली महिलांशी अश्लील कृत्ये केल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्याशी संबंधित सुमारे 58 अघोरी कृत्यांचे आणि अश्लील स्वरूपाचे व्हिडिओ मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धार्मिक विधी आणि अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली अशोक खरात लोकांकडून अमानवीय कृत्ये करून घेत असल्याचा आरोप आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी कारवाई केली.

दरम्यान, या प्रकरणात आता राजकीय वादही निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी दिवंगत अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग सोसायटीतील घराबाहेर अघोरी पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्या घटनेत अशोक खरातचा सहभाग असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.

हेही वाचा: Maharashtra Weather Update: पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी सतर्कतेचे; विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीचा इशारा, तर मुंबईतही पावसाची हजेरी

मिटकरी यांच्या मते, अशोक खरातचा VSR कंपनीशी संबंध असल्याची माहितीही समोर येत आहे. तसेच त्या कंपनीच्या मालकाशी त्याची ओळख असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे अशोक खरात आणि VSR कंपनीच्या मालकांमध्ये काही संबंध आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मिटकरी म्हणाले की, “कॅप्टन अशोक खरात हा भोंदू बाबा म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. या प्रकरणात पुढे आलेले राजकीय संबंध राज्याला अचंबित करणारे आहेत.” त्यांनी असा दावा केला की, अशोक खरातचे VSR विमानासमोरचे काही फोटोही समोर आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर अघोरी पूजा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्या अघोरी पूजेच्या मागे अशोक खरातचाच हात असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला.

मिटकरी यांच्या म्हणण्यानुसार, हा भोंदू बाबा भक्तांकडून तसेच काही राजकीय व्यक्तींमार्फत अघोरी पूजा करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात अजित पवारांच्या विमान अपघाताशी, VSR कंपनीशी आणि अशोक खरातने केलेल्या अघोरी पूजेशी काही संबंध आहे का, याबाबत आता शंका असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. या तपासातून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Pramod Sawant : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यात अँजिओग्राफी; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version