नव्या संसदेत राजदंडाची स्थापना

नव्या संसदेत राजदंडाची स्थापना

संसदेच्या नव्या इमारतीचे आज उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदंडाची विधीवत पूजा करून लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला स्थापित केला आहे. त्याअगोदर मोदींनी या राजदंडाला साष्टांग दंडवत घातला. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत ९७० कोटी रुपयांचा खर्च करुन नव्या संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचं देशाला लोकार्पण केलं. यावेळी तामिळनाडूवरून आलेल्या संत मंडळींनी वैदिक मंत्राचा जप केला. या विधींमध्ये पंतप्रधानांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला दिखील सहभागी झाले होते.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला नवीन संसदेत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवन विधी केले. यावेळी राजदंडाची पूजा केली. तसेच मोदींनी राजदंड आणि उपस्थित संतांना साष्टांग दंडवत घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजदंडाची पूजा केली, त्यानंतर संतांसमोर आदरपूर्वक साष्टांग नमस्कार केला. यानंतर संतांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नवीन संसद भवनात प्रवेश केला. त्यांनी राजदंड लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजूला वैदिक मंत्रोच्चारात स्थापित केला.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांचा सन्मान केला. नव्या संसद भवनाच्या बांधकामात सहभागी असलेल्या कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध भाषेत परमात्म्याचं स्मरण करण्यात आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version