एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छनिवृत्ती घेतल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केलाय. गेल्याच महिन्यात शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला होता. आज ‘मातोश्री’वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शर्मा यांना शिवबंधन बांधलं. ‘कुणाला हरवण्यासाठी नव्हे तर मी जिंकण्यासाठी लढतो’, असं यावेळी प्रदीप शर्मा यांनी म्हटलं. तसंच पोलीस सेवेमध्ये असताना माझ्यावर बाळासाहेबांचा प्रभाव होता, अशी कबुलीही प्रदीप शर्मा यांनी दिली. त्यांच्या मायेचा हात आपल्या पाठीवर आहे, असं शर्मा म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे आपल्याला भावासारखे असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘प्रदीप शर्मा पोलिस दलात असताना त्यांची गन बोलायची, आता त्यांचं मन बोलणार आहे’, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.
1983 रोजी प्रदीप शर्मा यांनी पोलीस दलात प्रवेश केला.
प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते.
2008 साली प्रदीप शर्मा यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.
2017 साली पुन्हा पोलीस सेवेत काम करण्यासाठी कार्यरत झाले होते.
प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केल्यामुळे त्यांना एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख मिळाली आहे.
काही महिन्यांपूर्वीच एन्काऊंटर स्पेशलिल्ट प्रदीप शर्मा यांनी स्वेच्छनिवृत्तीचा निर्णय घेतला आणि राजीनामा दिला.
प्रदीप शर्मा यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे सर्व स्तरावर याची चर्चा सुरू होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.