मुंबई: महाराष्ट्रात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 33 नगरपरिषदांपैकी 17 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात मोहोळ, ओझर, भुसावळ, शिर्डी, दिग्रस, अकलूज, बीड नगरपरिषदांचा समावेश आहे.
राज्यात बऱ्याच काळापासून रखडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.दरम्यान, 33 नगरपरिषदापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे.
33 नगरपरिषदापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर
देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.