शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जल्लोष बघितल्यावर शिवसेना कुणाची? हे दिसतयं! पाकिस्तान सुध्दा सांगेल खरी शिवसेना कोणाची, पण निवडणुक आयोगाला मोतीबिंदू झालाय तो त्यांचा प्रश्न. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र बघतोय. काही जणांना वाटले तेच शिवसेना पण अश्या अनेक घुशी आम्ही बघितल्या आणि निवडणुकीत आपटल्या. अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा सभेत ठाकरे बोलत होते. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आज खरच तात्यांची उणीव भासते, ४० गद्दार गेले तरी फरक पडत नाही पण एक निष्ठावंत गेले की उणीव जाणवते. तात्यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे लागेल असे वाटले नाही. वैशाली ताईंसोबत भेटीची आठवण. वैशाली ताईंचा अभिमान. शेतकऱ्यांच्या साठी झटणारे हे घराणे.
सर्वोच्च न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं ठाकरे म्हणाले. मी तीन वर्षात एकतरी प्रसंग मला सांगा की मी हिंदुत्व सोडले. मुख्यमंत्री म्हणून मी घटनेची शपथ घेतली. सर्व धर्मीयांना समान वागणूक दिली. मी हिंदुत्व सोडले नाही सोडणार नाही पण आपले हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही तर राष्ट्रीयत्व आहे, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
मेहनत तुम्ही करता आणि टिकोजीराव वर बसतात आता पुन्हा त्यांना खाली खेचण्याची वेळ. निवडून आलेले गद्दार झालेत पण निवडून देणारे आजही माझ्या सोबतच आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. आपले सरकार होत तेव्हा करोनाचे जागतिक संकट होतं. नैसर्गिक संकटात आपण सरकारमध्ये असताना मदत केली. आता सरकारच अवकाळी, यांनी एकाही संकटात मदत केली नाही मग हे बोलावेच लागणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.