Eknath Shinde : एकनाथ शिंदेची नाराजी? तडकाफडकी दिल्लीला रवाना, अमित शाहांची घेणार भेट

भाजपचे अध्यक्ष नितीन नबिन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. 
Eknath Shinde : एकनाथ शिंदेची नाराजी? तडकाफडकी दिल्लीला रवाना, अमित शाहांची घेणार भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे आपल्या या दौऱ्यामध्ये भाजपचे अध्यक्ष नितीन नबिन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. 

दरम्याने, जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठिकाणी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवलं जात असून, दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. रायगड मध्ये बहूमत असूनही तडजोड करावी लागली, तर फलटणमध्ये शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यात आलं, अशी खंत स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. या कारणामुळे एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version