Eknath shinde : ‘लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार केला…’, निवडणूकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची पुणेकरांना भावनिक साद

पुणे तिथ काय उणे म्हणतो फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या, लोकांना बदल हवा आहे&quot. 
Eknath shinde : ‘लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार केला…’, निवडणूकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंची पुणेकरांना भावनिक साद

सध्या सर्वत्र महाराष्ट्रात महापालिका निवडणूकांची धामधूम सुरू आहे. विविध पक्षाचे नेते एकमेकांवर घणाघात करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे पुण्यात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुण्यातील जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की,  "माझ्या लाडक्या बहिणी आणि भावाला विनंती करायला आलेलो आहे. निवडणुक ही पुण्याच्या भविष्याची निवडणूक आहे. पुणे तिथ काय उणे म्हणतो फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या, लोकांना बदल हवा आहे". 

पुढे ते म्हणाले की, "लाडक्या बहिणींनी विधानसभेत चमत्कार केला आताही चमत्कार करतील माझ्या बहिणी,काही लोक लाडकी बहिण बंद करायला चालले होते,कोणीही मायका लाल आला तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पुण्यातील कारभारी आता लोकांना बदलायचा आहे,अनेक वर्षी लोकांना अनेकांना पहिले आहे,आता शिवसेना हवी आहे, भगवं वादळ आहे. विकासाचे अनेक प्रकल्प राबवले, मुख्यमंत्री असताना अनेक योजना आणल्या, अनेक चांगले निर्णय  घेतले".  

"आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. लोकांना हवं आहे ते द्यायला हवं आहे. या ठिकाणी शिवसेनेला भरभरून यश मिळणार आहे. या महापालिकेत शिवसेना किंगमेकर आहे. शिवसेनेने अनेकांचा टांगा पलटी केला आहे. आपला अजेंडा विकास आहे. सोन्याचा चमचा घेऊन आलो नसलो तरी सामन्या लोकांना सोन्याचे दिवस आणणार आहे. अनेकांना मी मोठा झालेलो पाहवत नाही. पुणेकरांना भ्रष्टाचारमुक्त पुणे,गुंडगिरी मुक्त पुणे हवं आहे का?  धनुष्यबानाला कोणीही हलक्यात घेऊ नका. शिवसेनेचा वाघ दगडफेकेला घाबरत नाही.

पुण्याचे सस्कृति दगडफेक आणि गुंडगिरी नाही. दादागिरी करून कोणीही निवडून येत नाहीत. ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे. माझ्याकडे गृहनिर्माण आणि नगरविकास खाते आहे.त्यामुळे झोपडपट्टी मुक्त पुणे करू. पाणी मीटर नको असेल तर काढून फेकून देऊ, असे ते म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version