Eknath Shinde: ‘महिला आरक्षण विधेयक फेटाळणे दुर्दैवी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर साधला निशाणा

शिंदे यांनी पुढे म्हटले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न केला होता
Eknath Shinde: ‘महिला आरक्षण विधेयक फेटाळणे दुर्दैवी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर साधला निशाणा

मुंबई: लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ नामंजूर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. महिला आरक्षण विधेयक फेटाळले जाणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, काँग्रेस आणि इंडिया आघाडीने गरीब, आदिवासी, मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती-जमातीतील माता-भगिनींना संसदेत येण्यापासून रोखण्यासाठी महिला-विरोधी भूमिका घेतली. शिवसेना या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Varsha Gaikwad: ‘सरकारचा उद्देश शुद्ध नाही’; महिला आरक्षण विधेयकावरून वर्षा गायकवाड यांची केंद्र सरकारवर टीका

शिंदे यांनी पुढे म्हटले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीला वंदन करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न केला होता. मात्र विरोधकांच्या महिलांविषयी असलेल्या पूर्वग्रहांमुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. महिलांविषयी विरोधकांच्या मनात असलेला द्वेष आणि त्यांचा खरा चेहरा आज देशासमोर आला असल्याचा आरोप त्यांनी केला.

महिला आरक्षण विधेयक फेटाळले जाणे हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस ठरेल, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. देशातील लाडक्या बहिणींचे रुद्र रूप विरोधकांना आगामी काळात पाहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: Sanjay Raut: ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची मोडतोड करण्याचा डाव’; संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version