उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्यांनी आरोग्य सेवेची दुर्देशा केली. ज्यांनी मुंबई लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. आज हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात पोहोचले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत जोरदार प्रहार करताना वंदे मातरमवर झालेली चर्चा ही संघाची कपडे उतरवण्यासाठी होती का? अशी विचारणा केली. ते पुढे म्हणाले की, "मी एवढंच सांगेन अमित शाह यांच्यावर आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संघ ही राष्ट्रभक्त आणि देशभक्त संघटना आहे. देशावर संकट आलं तेव्हा त्याची प्रचिती आली आहे. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ३७० कलम रद्द करणं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं ते अमित शाह यांनी केलं.
हेही वाचा – Lokayukta Act: दोन वर्षे उलटली, कायदा अजून कागदावरचं! अण्णा हजारेंचं आमरण उपोषण, तारीखही सांगितली
ज्यांनी अनेक वर्षे लुटली, मुंबईची तिजोरी धुतली आणि कोव्हिड काळात रुग्णांच्या खिचडी गिळली, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातलं डांबर खाल्लं, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लं अशा लोकांनी अमित शाह यांच्याबाबत बोलणं ही शोकांतिका आहे. त्यांचा बॅलन्स गेलेला दिसतो आहे. त्यामुळे ते काहीतरी असंबद्ध बडबड करत आहेत असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.