पत्रकारांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणाची सविस्तर माहिती घेणार असल्याचे सांगितले. तसेच, खासदार संजय दिना पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “संजय दिना पाटील यांनी त्यांची भावना माझ्याकडे व्यक्त केली आहे. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता. पण काही जणांकडून दररोज विरोधकांविषयी अतिशय खालच्या दर्जाचे आणि अपशब्द वापरले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा केवळ एखाद्या व्यक्तीचा नव्हे, तर माध्यमांचाही अपमान आहे. पत्रकारांबाबत अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही,” असे मत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तीकडून काही अयोग्य शब्द गेले असतील तर दिलगिरी व्यक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले. तसेच, राजकीय वादाच्या नावाखाली कुटुंबीयांविषयीही आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, ज्यांच्या कुटुंबियांविषयी जे वक्तव्य केले जात आहेत, ती कुठली भाषा आहे?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.