Eknath Khadse: कागदपत्रांत खाडाखोड आणि वतन जमिनीचा पेच; एकनाथ खडसेंनी फेटाळले आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

खडसे यांनी आरोप फेटाळले असून प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
Eknath Khadse: कागदपत्रांत खाडाखोड आणि वतन जमिनीचा पेच; एकनाथ खडसेंनी फेटाळले आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या कथित जमीन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. साखर कारखाना उभारणीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी फसवणुकीने घेतल्याचा आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जमीन खरेदी प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांमध्ये खाडाखोड झाल्याची बाब तपासात समोर आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडसे यांनी सुमारे 25 वर्षांपूर्वी साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी केली होती, मात्र प्रत्यक्षात तेथे कारखाना उभारला गेला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

हेही वाचा: Thane First Planetarium : शनीची वलये अन् देवयानी दीर्घिका आता डोळ्यांच्या टप्प्यात; शहापूरमध्ये 5 एप्रिलला भव्य तारांगणाचे उद्घाटन

मानपूर तालुक्यातील चमेलीबाई तायडे यांनी खडसे यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे. “आमची फसवणूक झाली असून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी दिली आहे. 

एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, “या प्रकरणात कोणतेही तथ्य नाही. हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल करण्यात आला आहे.”

तसेच त्यांनी स्पष्ट केले की, संबंधित जमीन महार वतन जमीन नसून वर्ग-1 जमीन आहे. यासंदर्भात विधानसभेत महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनीही वर्ग-1 जमीन आणि महार वतन जमीन याबाबत स्पष्टीकरण दिल्याचा दाखला त्यांनी दिला.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील चौकशीत नेमके काय निष्पन्न होते, खडसे यांच्यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Summer Special Railway : आता प्रवासात दूर होणार गर्दीचा त्रास; मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेची उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version