पराभव जिव्हारी लागलाय – एकनाथ खडसे

पराभव जिव्हारी लागलाय – एकनाथ खडसे

राज्यसभेच्या निवडणुकीत गाफिल राहिल्याने शिवसेनेचा पराभव झाला असल्याचे वक्तव्य राषट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. तसेच विधानपरिषदेसाठी शिवसेनेने ताकही फुंकून पिण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. पराभव शिवसेनेचा तरी महाविकास आघाडीचा म्हणून जिव्हारी लागला असल्याचे खडसे म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. हा पराभव शिवसेनेला जिव्हारी लागला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी करावी, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version