‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न’

‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न’

रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला पत्र लिहिले होते, असा दावा रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे गटाचे जे काही मनसुबे होते ते उधळले गेले आहेत. त्यामुळेच रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत आहे, असा आरोपही उदय सामंत यांनी केला.

उदय सामंत म्हणाले, बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला काही जणांचा विरोध असला तरी या प्रकल्पाला अनेकांचे समर्थनही आहे. मात्र, प्रसारमाध्यमे केवळ विरोधकांच्याच बातम्या दाखवत आहेत. या प्रकल्पामुळे कोकणात रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्राच्या हिताचा हा प्रकल्प आहे. त्यामुळेच हा प्रकल्प व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. बारसूत रिफायनरी व्हावा, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला पत्र लिहिलेले नाही तर उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र लिहिले आहे.

आंदोलनस्थळी आंदोलकांना व पत्रकारांना पोलिसांनी मारहाण केली, या वृत्ताचे उदय सामंत यांनी खंडन केले. उदय सामंत म्हणाले, या केवळ अफवा आहेत. आंदोलकांसोबत कोणताही गैरव्यवहार करण्यात आलेला नाही. शांततेत त्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकार त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. आंदोलकांशी आमचा सुसंवाद आहे. तसेच, एकाच पत्रकाराला पोलिसांनी हटकले होते. तेदेखील पत्रकार विनाकारण वेगळेच प्रश्न आंदोलकांना विचारत होता. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याला अडवले. इतर कोणत्याही पत्रकारासोबत पोलिसांनी गैरवर्तवणूक केली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version