Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील पण काही लोकं गैरवापर करताय; पेट्रोल-डिझेलच्या साठेबाजीचा फडणवीसांना संशय

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांसाठी प्रयत्नशील पण काही लोकं गैरवापर करताय; पेट्रोल-डिझेलच्या साठेबाजीचा फडणवीसांना संशय

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या साठेबाजीच्या विषयावर परखड मत मांडले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पेट्रोल व डिझेल टंचाई संदर्भात चर्चा सुरु आहे. त्यात लक्षात येते की, सरासरीपेक्षा पेट्रोल व डिझेल मागणी वाढली आहेत. त्याची पूर्तता करत आहोत. मात्र यात साठेबाजी होताना निदर्शनास येत आहे. आता पुरवठा व गृह विभाग यावर संयुक्त कारवाई करतील. पेट्रोलचा जो आपला वापर आहे, त्यापेक्षा 23 टक्के जास्त पुरवठा करत आहोत. डिझेल संदर्भात 52 टक्के मागणी वाढली आहे. तरीही टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. अकोल्याला 154 टक्के मागणी वाढली आहे. इतर जिल्ह्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त खपत झाली आहे. शेतकरी यांना डिझेल मिळावे म्हणून आपण प्रयत्न करत आहोत. पण त्याचा गैरवापर काही जण करत आहे. व्यावसायिक वापराकडे सर्वसाधारण खपत वळवली जात आहे, का याचा शोध घेत आहोत. कुणीतरी साठेबाजी करत आहे. ती थांबवण्याचा प्रयत्न सुरु आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वळवले. 

हेही वाचा : MVA Protest On Onion Prices : गळ्यात कांद्याची माळ, बैलगाडीवर स्वार…, कांदे दरवाढीविरोधात मविआचे ‘रास्ता रोको’ आंदोलन; ‘या’ जिल्ह्यांमध्ये उमटले पडसाद

तसेच महाविकास आघाडीच्या कांदा आंदोलनाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले की, केंद्र सरकारने कांद्यावर साडेतीन रुपयांची वाढ केली. 15 रुपयांचा भाव केला आहे. मोठी खरेदी सुरु आहे. उद्या सायंकाळी केंद्राने याबाबत बैठक बोलावली आहे. केंद्र सरकार मध्यस्थी करत आहे. बाजारात आपण मध्यस्थी करत आहेत. राज्य सरकार कांदाप्रश्नी संवेदनशील आहे. काही लोकं याप्रकरणी राजकारण करत आहेत, असा टोला त्यांनी मविआच्या नेत्यांना लगावला आहे. फोटो ऑपॉर्च्युनिटी करत आहेत. तुमच्या काळात अशी खरेदी केली का?, हे दाखवा. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्न व तरतूद करत आहोत. कांदा कापल्यानंतरही अश्रू येणार नाहीत, असे लोक अश्रू ढाळत आहेत. निश्चित राजकारण गेले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांवर केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version