अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचे समन्स

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचे समन्स

‘पनामा पेपर्स लीक’ प्रकरणी आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला समन्स बजावले असून पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला हे समन्स बजावले आहेत. याअंतर्गत ऐश्वर्याला दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

सुत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री ऐश्वर्या रायने स्थगिती मागितली आहे. तसेच एजन्सीने स्थगिती स्विकारल्यामुळे आता ऐश्वर्याला हजर होण्यासाठीची नवी तारीख दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे ‘पनामा पेपर्स लीक’ प्रकरण?

पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे ५०० लोकांचा समावेश होता. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगपती, प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे आहेत. त्यात बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. या सर्वांवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. ज्याच्या मदतीने एजन्सी आता आपले काम करत आहे.

मागील अनेक दिवसांपासून पनामा पेपर्स प्रकरणी चौकशी सुरू आहे. तसेच या प्रकरणात अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर आली आहेत. तसेच अभिनेता अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात हजर झाला होता. तसेच ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलासुद्धा समन्स बजावले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version