सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत असताना कुठल्याही क्षुल्लक कारणावरून जोडपं घटस्फोट घेत असल्याचे समोर येत आहे. असाच प्रकार उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरमध्ये घडला आहे. जेवणात मीठाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे पतीने चक्क पत्नीला घटस्फोट दिला आहे. मीठ जास्त झाल्याने पतीने पत्नीची बेदम मारहाण केली आहे.
9 सप्टेंबर रोजी पत्नीच्या हातून जेवणात जास्त प्रमाणात मीठ पडल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले.
या भांडणात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली.
त्यापूर्वी हुंडासाठी सासरच्या माणसांनी तिचा प्रचंड छळ करत असल्याचे पत्नीने सांगितले.
4 डिसेंबर 2016 साली दोघेही विवाह बंधनात अडकले.
याप्रकरणी पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.