डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही डॉक्टरांना जामीन मंजूर

डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन्ही डॉक्टरांना जामीन मंजूर

काही महिन्यांपूर्वी नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन वरिष्ठ महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने तिन्ही वरिष्ठ डॉक्टरांना जामीन मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. 2 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

नेमकं काय घडलं ?

डॉ पायल तडवी यांनी रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काही महिन्यांपूर्वी नायर रुग्णालयात घडली होती.

नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी पायलला तिच्या जातीवरून रॅगिंग करत असल्याचे उघडकीस आले.

या छळाला कंटाळून पायलने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

याप्रकरणी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती.

मात्र आम्ही कारागृहात राहू शकत नसल्याचे तिन्ही डॉक्टरांनी म्हटलं आहे.

मुंबई उच्चन्यायालयाने 2 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याचे समजते आहे.

त्याचबरोबर सुनावणी सुरू असेपर्यंत तिन्ही डॉक्टारांचा परवाना रद्द करण्याचे आदेश महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलला दिले आहेत.

 

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version