हे उपाय करा, डोळ्यांखालील काळे घेरे होतील दूर

हे उपाय करा, डोळ्यांखालील काळे घेरे होतील दूर

रोजच्या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच वेळा अपुरा आहार आणि अपुरी झोप यामुळे आपल्या डोळ्यांखाली काळे घेरे येऊ लागतात. आपले डोळे ही आपली ओळख असते त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. काळे घेरे आल्याने आपले डोळे विचित्र दिसू लागतात आणि त्याने आपल्या चेहत्यावरील तेज देखील कमी होऊ लागते तर यावर उपाय काय ते जाऊनि घेऊया:

कॉफी मास्क वापरून आपल्या डोळ्या खालचे काळे घेरे कमी होण्यास मदत होते. हा मास्क कॉफी, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या मदतीने तयार केला जातो.

पाहूया हा मास्क कसा बनवावा:

साहित्य :
कॉफी पावडर -एक चमचा, मध- एक चमचा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल

कृती :

सर्वप्रथम एका वाटीत चमचाभर कॉफी आणि एक चमचा मध घ्या. त्यानंतर त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाका. त्यानंतर हे मिश्रण एकत्र करून घ्या. मग तुमचा मास्क तयार होई.

मास्क कसा वापराल ?

तयार मिश्रण डोळ्याखाली समानपणे लावावे. त्यानंतर ते साधारण १० मिनिटे असेच राहू द्या. मग चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.
चांगल्या परिणामांसाठी हा आय मास्क आठवड्यातून एक दिवस लावा.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version