मासिक पाळीमध्ये करा ‘हा’आहार

मासिक पाळीमध्ये करा ‘हा’आहार

मुंबई , २७एप्रिल २०२३, प्रतिनिधी :मासिक पाळीच्या काळात प्रत्येक मुलींनी सकस आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान मुलींना, महिलांना प्रचंड त्रास होतो. त्रासही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कुणाचे हातपाय गळून जातात. कुणाला वेदना असह्य होतात. अशात मासिक पाळी दरम्यान तुम्ही काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत.

१.पाळीसुरूअसताना आहार हलका व नेहमी पेक्षा कमी प्रमाणात घ्यावा.

२.तेलकट तळलेले, मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाऊ नयेत.

३.या दिवसात शरीरातील ऊर्जा कमी झालेली असते. आहार जास्त घेतला तर त्याचे पचन व्यवस्थित होत नाही. अपचनामुळे शरीरातील आम निर्मिती होऊन बरेच आजार जडतात, म्हणून शरीराला उत्साह व बळ मिळेल असा हलका आहार घ्यावा. भाज्यांचे सूप, शहाळ्याचे पाणी,संत्री,मोसंबी अशा प्रकारच्या फळांचे रस तसेच नाचणीची पेज घ्यावी.

४.शक्यतोजेवणताजे व गरम असावे. पालक,  माठ, चाकवत, राजगिरा भाज्या खाव्यात.

५.टोमॅटो,गाजर यांची कोशिंबीर व जीवनसत्वे प्रोटीन युक्त आहार घ्यावा. दूध, कडधान्य ,फळे, भाज्या यांचा समावेश असावा.

६.वेदनाकमी करण्यासाठी अजवाईन  गरम किंवा कोमट पाण्यामध्ये  घ्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version