बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि रेश्मा बागल शिवसेनेच्या वाटेवर

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि रेश्मा बागल शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जवळील असलेले बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असून आठ दिवसात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. असं सांगण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्या करमाळाच्या रेश्मा बागल – कोलते हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून 20 ऑगस्ट रोजी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीला पुन्हा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे. सोलापूरातील बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील विधालसभेची जागा शिवसेनेत येत असल्याने ते हा प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

मुंबईत राष्ट्रवादीची उमेदवार निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे हजर नव्हते. त्यामुळे ते सेनेत प्रवेश करणार हे निश्चित मानलं जातं आहे. सोपल यांनी बार्शीत कार्यकर्ता मेळावा देखील पार पडला आहे.

तर राष्ट्रवादीच्या नेत्या करमाळाच्या रेश्मा बागल – कोलते हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असून 20 ऑगस्ट रोजी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version