प्रियांकाने केली चोरी ?

प्रियांकाने केली चोरी ?

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : ‘बिग बॉस 16’ फेम अभिनेत्री प्रियांका चौधरी अडचणीत आहे.अभिनेत्री प्रियांका चौधरीवर चक्क कपडे चोरण्याचा आणि स्टाईल कॉपी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात असलयाचे म्हंटले जात आहे. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर इशिता गुप्ताने प्रियांकावर हे आरोप केलेत.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रियंकाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. यात तिने बिज रंगाचा रफल लेहंगा परिधान केला होता. हे पाहताच अभिनेत्री प्रियंकाने ब्रँडेड कपडे चोरल्याचा आरोप डिझाईनर इशिताने केलाय. त्याचबरोबर “माझी स्टाईलउषा चोरली “असं ती म्हणाली.

इशिताने म्हणाली की,’प्रियांकाने घातलेले कपडे हे तिच्या ब्रँडचे असून त्या कपड्यांना तिने डिझाइन केलं होतं. आपापल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्ववीत करत तिने असा दावा केलाय. तिने ट्विटमध्ये लिहिलं,”एका वेड्या पीआर टीमसोबतची महिला, जी दुसऱ्यांना त्रास देणं बंद करत नाहीये. दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी तिने स्वतःचे बनावट व्यक्तिमत्व तयार केले आहे. जर तिला वाटत असेल की,’ माझ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या डिझाइनचे कपडे परिधान करून ती माझ्यासारखी बनू शकते. तर त्यासाठी कदाचित तिला एक अब्ज पुनर्जन्म घ्यावे लागतील. माझे 30 हजार पाऊंडचे कपडे तिने चोरले आहेत. त्यावर मी काहीच बोलले नाही. पण ब्लॉक केल्यानंतरही ती माझ्या स्टाइलला सुद्धा कॉपी करतेय’, असं तिने पुढे लिहिलंय.

यानंतर तिने आणखी एक ट्विट करत प्रियांकावर निशाणा साधलाय, त्यात ती म्हणाली,”माझ्याकडे तिने मागितले असते तर मी तिला दिले असते. मात्र पीआर करण्याची ही योग्य पद्धत नाही. स्वत: लढा आणि त्याच्या जोरावर पीआर करा. मला अशा अशिक्षितांसोबत संबंध ठेवण्यात काही रस नाही.” इशिताने केलेल्या आरोपांवर प्रियंकाने अद्याप काही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र तिचे चाहते प्रियांकाची बाजू घेत ट्विट करू लागले आहेत. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version