देशात नुकताच 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने मनोरंजन सृष्टीनं प्रेक्षकांना बॉर्डर 2 ही सैन्य दलावर आधारीत चित्रपटाची पर्वणी दिली. गेल्या आठवड्यात 23 जानेवरी रोजी प्रदर्शित झालेल्या बॉर्डर 2 चित्रपटाला प्रजासत्ताक दिनी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतू गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला धुरंधर आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालून आहे. हे त्याच्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिसून येत आहे. धुरंधरनं 26 जानेवारी रोजी चित्रपटगृहातील 52 व्या दिवशी तब्बल 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
धुरंधर हा चित्रट शुक्रवार, 30 जानेवारी रोजी ओटीटीवर येणार आहे. सॅकनिल्कवरील बॉक्स ऑफिसच्या अंदाजानुसार, आठव्या आठवड्यात प्रवेश करणाऱ्या या चित्रपटाने आठवड्याच्या शेवटी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तसेच 177 कोटी रुपयांची प्रभावी कमाई करणाऱ्या 'बॉर्डर 2' ला मागे टाकले आहे, .
'धुरंधर' हा चित्रपट आता फक्त एकाच भाषेत हिंदीमध्ये प्रदर्शित होऊन 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारा इतिहासातील पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. 'बाहुबली 2: द कन्क्लुजन', 'केजीएफ: चॅप्टर 2' आणि 'पुष्पा 2: द रूल' यांसारख्या याआधीच्या विक्रमधारक चित्रपटांना अनेक भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करून हा टप्पा गाठला होता.
'धुरंधर' ओटीटी रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाने आता 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे निर्माते आता चित्रपटाच्या डिजिटल टेकओव्हरसाठी सज्ज झाले आहेत. 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला 'धुरंधर' आता 30 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर ऑनलाइन प्रदर्शित होईल. तसेच त्याचा सिक्वेल 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.