Dhurandhar Movie Controversy: गेल्या महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणाऱ्या रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाला केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा दणका दिला आहे. 750 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केलेल्या या सिनेमातील काही आक्षेपार्ह शब्द आणि संवाद त्वरित काढून टाकण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B Ministry) दिले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
दरम्यान, 1 जानेवारी 2026 पासून देशभरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये 'धुरंधर'ची सुधारित आवृत्ती (Edited Version) दाखवली जाणार आहे. 31 डिसेंबर रोजी मंत्रालयाने निर्मात्यांना तातडीची नोटीस पाठवली होती. यामध्ये प्रामुख्याने 'बलूच' (Baloch) हा शब्द म्यूट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय, एका महत्त्वाच्या संवादासह आणखी दोन शब्द बदलण्याचे निर्देश देण्यात आले असून, तांत्रिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे समजते.
हेही वाचा – Sunny Leone Mathura Event: 'सनातन धर्माला बदनाम करण्याचा…' मथुरेत सनी लिओनीच्या कार्यक्रमावर संतांचा आक्षेप
सरकारच्या या आदेशानंतर चित्रपट वितरकांनी आणि निर्मात्यांनी युद्धपातळीवर काम करून जुने 'डिजिटल सिनेमा पॅकेज' (DCP) बदलले आहे. नवीन वर्षाच्या सकाळच्या शोपासून केवळ 'सेन्सॉर' केलेली नवी आवृत्तीच पडद्यावर दिसणार आहे. जुन्या आवृत्तीचे प्रदर्शन तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश सर्व चित्रपटगृह मालकांना ई-मेलद्वारे देण्यात आले आहेत.
वादांची मालिका सुरूच
तथापी, 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या सावटात आहे. हुतात्मा मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबियांनी यापूर्वीच सिनेमातील काही भागांवर नाराजी व्यक्त केली होती. तथापी, काही आखाती देशांनी या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. भारत-पाकिस्तान संघर्षावर आधारित कथानकामुळे हा चित्रपट सातत्याने चर्चेत राहिला आहे. रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या जबरदस्त अभिनयामुळे हा चित्रपट 2025 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला असला, तरी आता सरकारी कात्रीमुळे चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.