धुळे शहरातील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल नवजात बालकासाठी तेथील डॉक्टरांनी गाणं गायलं आहे. हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. डॉक्टरांनी ज्या कारणासाठी हे गाणं गायलं त्यामागचे कारण समजल्यावर अनेकांनी त्यांची स्तुती केली आहे. एवढच नाही तर त्यांचा गाण्याचा व्हिडिओ देखील तुफान शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ धुळ्यातील संगोपन रूग्णालयातील असून डॉ. अभिनय दरवडे असे ह्या डॉक्टरांचे नाव आहे.
एनसीआययूमधील ९०० ग्राम वजनाच्या या चिमुकल्याला झोपच येत नव्हती. हे बाळ आजूबाजूच्या बाळांना त्रास होईल इतक्या जोरात रडायला लागले. त्यामुळे डॉकटर अभिनय यांनी त्या बाळाला आपल्या केबिनमध्ये आणले आणि गाणं म्हटलं.तसं ते बाळ शांत होऊन गाणं ऐकू लागलं आणि नंतर दोन तीन गाणी म्हटल्यावर झोपी गेलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.