धुळ्यात एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

धुळ्यात एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये निमगुळ गावाजवळ एस टी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद – शहादा याबसला समोरून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एसटी बस  ही अर्धी कापली गेली आहे. यात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बाकी तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गंभीर जखमींना धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कंटेनर चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाला आहे.

या लोकांचा मृत्यू

1) शकील मो. बागवान, शहादा

2)प्रेरणा श्रीराम वंजारी, शहादा

3) इद्रिस नासिर मणियार, तळोदा

4) मुकेश नगीण पाटील, बस चालक, शहादा

5) हस्तिक आनंद वाघ, ठाणे

6) वृषाली दीपक भावसार, शहादा

7) संजय ताराचंद अलकरी, शहादा

8) संतोष कारभारी ठोंबरे, औरंगाबाद

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version