Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या मंचावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसह जयघोष; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर सावध पवित्रा, वाद सावरला?

महाराष्ट्रातील तीव्र विरोधानंतर त्यांनी भूमिका बदलली असून नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला.
Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या मंचावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसह जयघोष; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर सावध पवित्रा, वाद सावरला?

नागपूर: हिंदू कथाकार धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होताच विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला. राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना बागेश्वर बाबांवर टीकेची झोड उठली होती.

या वाढत्या दबावानंतर अखेर बागेश्वर बाबांनी त्यांची भूमिका बदलत माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे मान्य करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. महाराष्ट्रातून झालेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर त्यांनी हा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या पाच दिवसांच्या रामकथा कार्यक्रमातही त्यांचा बदललेला दृष्टिकोन दिसून आला. कार्यक्रमाच्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला असून, शिवरायांच्या जयघोषांनी वातावरण दुमदुमले. यामुळे वादानंतर प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: Michael Movie Collection: पॉपचा बादशहा MJ चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; मायकेल जॅक्सनच्या बायोपिकची ऐतिहासिक ओपनिंग; पहिल्याच दिवशी कमावले…

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश राजकीय नेत्यांनी दिल्यानंतर बागेश्वर बाबांची भूमिका मवाळ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबावाचीही चर्चा रंगली आहे.

एकूणच, या वादानंतर बागेश्वर बाबांची भूमिका बदलल्याचे स्पष्ट दिसत असले, तरी या प्रकरणावर पुढे कोणत्या प्रतिक्रिया उमटतात आणि राजकीय पातळीवर याचे पडसाद किती उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Mumbai Accident Marine Drive: मुंबईत पहाटेच घडला थरकाप उडवणारा अपघात; 3 जणांनी गमावला जीव

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version