मुंबई, १४ मे, २०२४, प्रतिनिधी : राज्यातील लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरूच आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन जाहीर सभा होणार आहेत. डहाणू, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी सभा होणार आहेत. डहाणू येथे हेमंत सावरा यांच्या प्रचारार्थ फडणवीस सभा घेणार आहेत आणि ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत तर वरळी येथे यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी फडणवीसांची सभा होणार आहे. जांबोरी येथील सभेतून फडणवीस यांची तोफ दहाडते याकडे सर्वांचे लक्ष आहे. फडणवीसांच्या वरळीत होणाऱ्या सभेकडे विशेषता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्या ठिकाणी फडणवीस काय बोलतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.