Devendra Fadnavis: मराठीचा आग्रह धरणं चुकीचं नाही, पण…; मुंबईतील भाषिक वादावर मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मांडली सरकारची भूमिका

मराठी शिकण्यावर भर देत सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन त्यांनी केले असून, सरकार सकारात्मक मार्गाने निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Devendra Fadnavis: मराठीचा आग्रह धरणं चुकीचं नाही, पण…; मुंबईतील भाषिक वादावर मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मांडली सरकारची भूमिका

नागपूर: महाराष्ट्रात सध्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई किंवा महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह धरणे चुकीचे नाही, मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा हिंसक मार्ग स्वीकारणे योग्य ठरणार नाही.

फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारची भूमिका ही संतुलित आणि सकारात्मक आहे. “ज्या चालकांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवू. पण भाषेच्या नावावर हिंसा करणे अजिबात मान्य नाही,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले. त्यामुळे सरकार मराठी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेत असले तरी ते शांततेच्या मार्गानेच पुढे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Mumbai Local Megablock: मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 15 तासांचा मेगाब्लॉक; कसारा लोकलपासून मेल-एक्स्प्रेसपर्यंत ‘हे’ मोठे बदल, वाचा सविस्तर वेळापत्रक

मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा विचार सध्या चर्चेत आहे. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सूचित केले की, राज्यात काम करणाऱ्या प्रत्येकाने स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, हे बंधन घालताना कुठलाही तणाव निर्माण होऊ नये, याची काळजी घेण्यात येईल.

एकूणच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेच्या प्रश्नावर संतुलित भूमिका घेतली आहे. “मराठी बोलावी, शिकावी आणि जपावी,” हा संदेश त्यांनी दिला असला तरी, त्याचबरोबर सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरल्याने या विषयाला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे. आगामी काळात सरकार या संदर्भात नेमकी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Sunetra Pawar: सुनेत्रा पवार भावी मुख्यमंत्री? पुण्यात झळकलेल्या फलकांमुळे एकच खळबळ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version