Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा नवा राजकीय विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांना टाकले मागे; महाराष्ट्रात तिसरे स्थान

१२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ २,४३० दिवसांवर पोहोचला असून त्यांनी शरद पवार यांना मागे टाकत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्या
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा नवा राजकीय विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांना टाकले मागे; महाराष्ट्रात तिसरे स्थान

देमहाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आणखी एका महत्त्वाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मागे टाकत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या नव्या विक्रमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

१२ जुलै २०२६ पर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ २,४३० दिवसांचा, म्हणजेच सुमारे ६ वर्षे ७ महिन्यांचा झाला आहे. याच कालावधीमुळे त्यांनी शरद पवार यांच्या २,४१२ दिवसांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरू असल्याने हा आकडा आगामी काळात आणखी वाढणार आहे.

हेही वाचा:Vinayak Raut: "5 करोड, थ्री रुम फ्लॅट, 2 लाख दरमहा, गाडी आणि…" सुनेच्या आपोरांनंतर राऊतांनी सांगितली 'ती' बाजू; काय म्हणाले?

शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चार वेळा जबाबदारी सांभाळली होती. मात्र, त्यांच्या कोणत्याही कार्यकाळाला पूर्ण पाच वर्षांचा कालावधी लाभला नाही. विविध राजकीय घडामोडी आणि बदलत्या सत्तासमीकरणांमुळे त्यांचे प्रत्येक कार्यकाळ वेगवेगळ्या टप्प्यांवर संपुष्टात आले.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यांचा पहिला कार्यकाळ सलग पाच वर्षांचा होता आणि तो राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतरचा दुसरा कार्यकाळ अवघ्या सहा दिवसांचा ठरला. तर तिसरा कार्यकाळ सध्या सुरू असून, १२ जुलै २०२६ पर्यंत या कार्यकाळाला ५८५ दिवस पूर्ण झाले आहेत.

महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये वसंतराव नाईक हे आजही अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी तब्बल ४,०९६ दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख असून त्यांचा कार्यकाळ २,६८६ दिवसांचा होता. आता देवेंद्र फडणवीस यांनी २,४३० दिवसांच्या कार्यकाळासह तिसरे स्थान पटकावत शरद पवार यांना चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे.

हेही वाचा:Political Crisis: विरोधी पक्षाचे 10 आमदार देणार राजीनामा; मुख्यमंत्र्यांच्या 'ऑपरेशन L'ने वाढवली धाकधूक

राजकीय विश्लेषकांच्या मते, मुख्यमंत्रीपदावरील सातत्य, दीर्घकालीन नेतृत्व आणि राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर हा विक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः सध्याचा कार्यकाळ सुरू असल्यामुळे फडणवीस यांच्या नावावर भविष्यात आणखी नवे विक्रम नोंदवले जाऊ शकतात.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या आकडेवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील नेतृत्वाचा प्रवास पुन्हा चर्चेत आला आहे. आगामी काळात फडणवीस यांच्या कार्यकाळात आणखी किती दिवसांची भर पडते आणि ते पुढील क्रमांक गाठू शकतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version