Devendra Fadanvis : "लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसाव लागेल…"Ladki Bahin Yojana वरून सभागृहात गदारोळ; फडणवीसांचा थेट इशारा

नागपूर विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झाले असून आज याचा दुसरा दिवस आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्याच नेत्याला घरी बसवेन असा इशारा दिला आहे.
Devendra Fadanvis : "लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसाव लागेल…&quotLadki Bahin Yojana वरून सभागृहात गदारोळ; फडणवीसांचा थेट इशारा

सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपूर विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कालपासून सुरु झाले असून आज याचा दुसरा दिवस आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्याच नेत्याला घरी बसवेन असा इशारा दिला आहे. नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे नेते अभिमन्यू पवारांनी अध्यक्ष महोदयांसमोर अवैद्य दारुविक्रीवर सवाल उपस्थित केले. यावेळी त्यांनी बोलताना लाडकी बहीण योजनेविषयी काही वक्तव्य केली, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थेट सुनवलं. 
हेही वाचा- Nagpur Crime News: नागपूर हादरले! नोकरीचे आमिष दाखवत लग्न केले; फसवणूक आणि मानसिक छळामुळे कबड्डीपटूने घेतला थेट टोकाचा निर्णय

भाजपचे अभिमन्यू पवारांनी अध्यक्षांना सवाल करत म्हटले की, “माननिय मंत्री महोदयांनी दिलेल्या उत्तरावर आम्ही सहमत आहोत. माझा विषय याच अनुषंगाने आहे. की, अवैध दारूच्या विषयांमध्ये मी मागच्या सरकारमध्ये एक लक्षविधी मांडली होती. आताच्या काळात एक लक्षविधी मांडली. त्यामुळे दोन लक्षविधी झाल्या. आपल्या दालनामध्ये  6 फेब्रुवारीला 23 ला 23 जानेवारी 25 ला 14 जुलै 25 ला तीन बैठका झाल्या आणि इतिवृत्त माझ्याकडे इतिव तुम्हाला पटवून देतो. या इतिवृत्त अजूनही कारवाई नाही झाली. खरं तर अत्यंत चिंतेचा विषय आहे. ग्रामीण भागातल्या प्रत्येक आमदाराचा हा विषय आहे. माझ्या एकट्याचा हा विषय नाही, सर्वांचा आहे. हा विषय ग्रामीण भागातल्या आमदारांना विचारा त्यांना रोज कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते. कुठेही गेलो तरी आमच्या महिला भगिनी आम्हाला आरोपी दारुविषयी विचारतात. आपण लाडक्या बहिणी बोलतो, लाडक्या बहिणींच दु:ख काय आसेल, तर अवैध दारूवर आळा घालण्याच दु:ख आहे. आपण आदेश दिले एक्साइज डिपार्टमेंटला, फूड अॅंड ड्रग्सला आणि होम डिपार्टमेंटला. जर अध्यक्ष महोदयांनी निर्देश देऊन सुद्धा काय कारवाई होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे.”

हेही वाचा- Devendra Fadnvis : ‘त्यांनी पाण्यात उड्या टाकून पाहिल्या, पण काँग्रेसच्या विषारी प्रचाराला…’; मुख्यमंत्री फडणवीसांची काँग्रेसवर सडकून टीका
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अध्यक्ष महोदय मी या सदस्यांना सांगतो की, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणु नका, लाडक्या बहिणीच्या विरोधात जाऊ नका, घरी बसाव लागेल… प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण.. लाडक्या बहिणींचे पैसे चालुच राहतील. ती योजना सुरुच राहिल त्या योजनेला दुसऱ्या योजनेशी तुलना करता येऊ शकणार नाही. हे आपण लक्षात ठेवा.” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना थेट इशारा दिला आहे.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version