Devendra Fadanvis on Ramayana:’रामायण’ला ऑस्कर मिळाला नाही तर…; मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील फिल्मसिटीतील अत्याधुनिक प्राईम फोकस स्टुडिओच्या उद्घाटनावेळी या चित्रपटाचे कौतुक केले.
Devendra Fadanvis on Ramayana:’रामायण’ला ऑस्कर मिळाला नाही तर…; मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

मुंबई : रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याची भव्यता, VFX आणि तांत्रिक दर्जाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगाव येथील फिल्मसिटीतील अत्याधुनिक प्राईम फोकस स्टुडिओच्या उद्घाटनावेळी या चित्रपटाचे कौतुक केले. “‘रामायण’ला ऑस्कर मिळाला नाही, तर ऑस्करच्या ज्युरीवरच निराश होईन,” असे वक्तव्य त्यांनी केले.

फडणवीस म्हणाले की, प्राईम फोकसने अत्यल्प कालावधीत जागतिक दर्जाची सुविधा उभारली असून, भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’ संकल्पनेला बळ देणारे हे केंद्र असल्याचे सांगत, ‘रामायण’ चित्रपटाचे बहुतांश पोस्ट-प्रॉडक्शन आणि VFXचे काम याच स्टुडिओत झाल्याचा त्यांनी उल्लेख केला.

यावेळी त्यांनी मुंबईची फिल्म इंडस्ट्री इतर राज्यांत जाणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. मुंबईची नैसर्गिक फिल्म इकोसिस्टिम अद्वितीय असल्याचे सांगत, फिल्मसिटीच्या पुनर्विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, येथे जागतिक दर्जाची फिल्ममेकिंग सुविधा उभारली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version