Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला, कामकाजाला सुरूवात

दभार स्वीकारण्यापूर्वी त्या सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं.
Deputy CM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला, कामकाजाला सुरूवात

महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्या सकाळी सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्या मंत्रिमंडळ बैठकीस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयालाही भेट देणार आहेत.त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू झाली आहे. आज रात्री त्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी पहाटे दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली. अशातच आता सुनेत्रा पवारदेखील दिल्लीला दाखलं होणार आहेत त्यामुळे आता राजकारणाला कोणतं वळण लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version