Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमाचा डंका! ‘देऊळ बंद 2’च्या यशाने मुख्यमंत्रीही भारावले, टीमला दिल्या खास शुभेच्छा

‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Deool Band 2: बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमाचा डंका! ‘देऊळ बंद 2’च्या यशाने मुख्यमंत्रीही भारावले, टीमला दिल्या खास शुभेच्छा

Deool Band 2: 'देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची' हा मराठी चित्रपट सध्या राज्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असून बॉक्स ऑफिसवरही विक्रमी कमाई केली आहे. चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले.

मुंबईत पार पडलेल्या या भेटीत चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, निर्माते कैलाश वाणी, अभिनेत्री स्नेहल तरडे तसेच चित्रपटाशी संबंधित अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. चित्रपटाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून समाजातील विविध स्तरांतील लोकांना जोडण्याची ताकद त्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी असो किंवा शहरातील सामान्य प्रेक्षक, प्रत्येकाच्या भावनांना स्पर्श करण्याची क्षमता या चित्रपटात दिसून येते. त्यामुळेच हा चित्रपट सर्व स्तरांत लोकप्रिय ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: Motherhood : अखेर सुखाचे अश्रू! 7 वेळा 'IVF' अपयशी आणि मिसकॅरेजनंतर प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या 45 व्या वर्षी झाली जुळ्या मुलांची आई

'देऊळ बंद 2'च्या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांच्या स्पर्धेतही या चित्रपटाने आपली वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपटाने अवघ्या 16 दिवसांत तब्बल 65 कोटी रुपयांचा व्यवसाय करत मराठी सिनेसृष्टीसाठी नवा मापदंड निर्माण केला आहे. हा आकडा मराठी चित्रपटांच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरींपैकी एक मानला जात आहे.

लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, प्रेक्षकांनी या चित्रपटावर ज्या प्रकारे प्रेमाचा वर्षाव केला आहे, तेच या यशाचे खरे कारण आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली शाबासकी ही संपूर्ण टीमसाठी मोठी प्रेरणा असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: Bollywood Producer Death: चित्रपटसृष्टीवर शोककळा! अक्षय, गोविंदासह अनेक कलाकारांचं नशीब बदलवणाऱ्या दिग्गज निर्मात्याचं निधन

चित्रपटाच्या यशामागे कलाकारांबरोबरच तंत्रज्ञांचेही मोठे योगदान आहे. छायाचित्रण, संगीत, कथा आणि सादरीकरण या सर्व बाबींमध्ये चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच चित्रपटगृहांमध्ये अजूनही प्रेक्षकांची गर्दी कायम आहे.

सध्या सोशल मीडियावर आणि मनोरंजन विश्वात 'देऊळ बंद २'ची जोरदार चर्चा सुरू असून चित्रपटाचा यशस्वी प्रवास अजूनही कायम आहे. मराठी चित्रपटसृष्टीला नवी ऊर्जा देणाऱ्या या चित्रपटामुळे आगामी काळातही दर्जेदार मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version