Nashik Crime: धक्कादायक प्रकार! देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमधून 82 लाखांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सची चोरी

देवळाली कॅम्पच्या मिलिटरी हॉस्पिटलसाठी पाठवलेल्या तब्बल 82 लाखांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सची चोरी उघड झाली आहे.
Nashik Crime: धक्कादायक प्रकार! देवळाली मिलिटरी हॉस्पिटलमधून 82 लाखांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सची चोरी

नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प परिसरातून मोठ्या प्रमाणावर औषध चोरीचा प्रकार समोर आला आहे. देवळाली येथील मिलिटरी हॉस्पिटलसाठी पाठवण्यात आलेल्या तब्बल 81 लाख 99 हजार रुपयांच्या इन्शुलिन इंजेक्शन्सचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका निलंबित लष्करी शिपायासह निवृत्त कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणी सुभेदार रामराव निवृत्ती शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे 2024 मध्ये मुंबईतील कांदिवली येथील आर्मी मेडिकल स्टोअर डेपोतून देवळाली मिलिटरी हॉस्पिटलसाठी 133 बॉक्समध्ये विविध औषधसाठा पाठवण्यात आला होता. या साठ्यात मधुमेह नियंत्रणासाठी वापरली जाणारी महागडी इन्शुलिन इंजेक्शन्स होती.

या औषधांमध्ये ‘इन्शुलिन डेग्लुडेक’, ‘ह्युमन इन्शुलिन’ आणि इतर प्रकारच्या इंजेक्शन्सचा समावेश होता. एकूण 12 हजार 662 इंजेक्शन्स गायब झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 992 डेग्लुडेक इंजेक्शन्स, 972 इतर प्रकारची इन्शुलिन इंजेक्शन्स आणि 10 हजार 698 ह्युमन इन्शुलिन इंजेक्शन्सचा समावेश आहे.तपासादरम्यान तत्कालीन लष्करी शिपाई नीरज सिंग आणि निवृत्त कर्मचारी विनायक विठ्ठल कांबळे यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचा संशय आहे. हॉस्पिटलमध्ये औषधे जमा न करता ती देवळाली परिसरातील एका चाळीत नेण्यात आली. तेथे मूळ बॉक्स उघडून औषधांचे नव्याने पॅकिंग करण्यात आले.यानंतर हा माल टेम्पोद्वारे पुण्यातील कलाशंकरनगर भागातील ठिकाणी पाठवण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लष्करी गुप्तचर विभागाने जवळपास दोन वर्षे या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर संपूर्ण घोटाळा उघडकीस आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version