‘द्रौपदी मूर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी’

‘द्रौपदी मूर्मू यांना पाठींबा देण्याची मागणी’

एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांच्या बंड केल्यानंतर तसेच काही निवडक खासदारांच्या आग्रहानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पक्षातील काही सहकाऱ्यांच्या हट्टानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे एनडीएला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला १० ते १२ खासदारांचा पाठिंबा असल्याचं वृत्त येत आहे. तसा दावाही एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार करत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज सेना खासदारांची बैठक बोलावली होती. २२ खासदारांपैकी केवळ १० खासदार ‘मातोश्री’ला पोहोचले आहे. पुढचे तीन तास उद्धव ठाकरे खासदारांची ‘मन की बात’ ऐकणार आहेत. त्यानंतर ते कदाचित एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ शकतात, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. यूपीएकडून यशवंत सिन्हा तर एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच निवडणुकीत भाजपच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी सेनेमधील काही खासदारांची मागणी आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसं पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पक्षातील पडझडीला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. आता खासदारांचं म्हणणं ऐकून घेऊन, त्यावर मंथन करुन उद्धव ठाकरे एक पाऊल मागे येऊ शकतात किंबहुना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version