आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. यावेळी विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान अमरावती, मालेगावमध्ये झालेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. अमरावती, मालेगाव येथे जाणीवपूर्वक दंगल घडवून आणली असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
अमरावती, मालेगाव दंगल प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत वक्तव्य केले. या दंगलीमध्ये जाणीवपूर्वक हिंदूंची दुकाने फोडली असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तर पहिल्या दिवशी घटनेचे समर्थन करण्यात आले असून दुसऱ्या दिवशी घटनेबाबत कारवाई करण्यात आली असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
टीका करणाऱ्याला आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न होत आहे, असे म्हणत विधानभवनाच्या सभागृहात फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांचा मुद्दा सादर करण्यात आला. गोपीचंद पडळकरांवरच्या हल्ल्याबाबत अद्याप कारवाई केली नसल्याचेही फडणवीस म्हणाले. राज्यात राजकीय हत्त्या होऊ देऊ नका, असे म्हणत कारवाई न केलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा, असेही ते म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.