नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: मोदी विरोधकांना मोठा राजकीय दणका बसला आहे. दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत स्पष्ट बहुमताने संमत झाले. याआधी हे विधेयक लोकसभेतही बहुमताने संमत झाले. यामुळे दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्या यांचे अधिकार केंद्र सरकारच्या अधीन राहणार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मोदी विरोधकांनी एक आघाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दिल्ली सेवा विधेयक संमत झाल्यामुळे या आघाडीला धक्का बसला आहे. आघाडीचे सदस्य असलेल्या आम आदमी पक्षाला राजकीय फटका बसला आहे. याचे राजकीय पडसाद लवकरच उमटतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याआधी राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आम आदमी पक्ष लवकरच काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीतून बाहेर पडेल असे भाकीत वर्तवले आहे. हे भाकीत खरे होणार की नाही याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.