सुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

सुशांतच्या आयुष्याशी निगडित असलेल्या चित्रपट प्रदर्शनाला स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या जीवनावर आधारित ‘न्याय : द जस्टीस’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला . मात्र हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. सुशांतसिंह राजपूत याचे वडील कृष्णकिशोर सिंह यांची याबाबत केलेली याचिका न्या. संजीव नरुला यांनी फेटाळली असून आपल्या मुलाच्या नावाचा वापर कोणालाही करू दिला जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच कोणत्याही परवानगीविना सुशांतच्या आयुष्याशी निगडित चित्रपट तयार करणे अथवा पुस्तक प्रकाशित करणे हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, यासाठी कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे, असंही सुशांतच्या वडिलांचे म्हणणे आहे. या चित्रपटामध्ये सुशांतसिंहच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्यात आला आहे, त्यामध्ये त्याचे नाव, कारकीर्द आणि अनेक गोष्टींमध्ये समानता आहे, त्यामुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक जण सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेत असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. ही याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिग्दर्शक दिलीप आणि निर्मात्या सरला सराओगी यांना सुनावणीपर्यंत चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version