दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने आज मंगळवारी दुसरी यादी जाहीर केली आहे.
भाजपने दुसऱ्या यादीत १० उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. भाजपने नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून केजरीवाल यांच्या विरोधात सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने आपली पहिली यादी १७ जानेवारीला जाहीर केली होती. यामध्ये भाजपने एकूण ५७ जणांना तिकीट दिलं होत.
संबंधीत बातमी : दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० : भाजपच्या ५७ उमेदवारांची यादी जाहीर
यामुळे भाजपने आता एकूण ७० पैकी ६७ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने देखील दुसरी आणि तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने दुसऱ्या यादीत ७ तर तिसऱ्या यादीत ५ उमेदवारांना संधी दिली आहे.
काँग्रेसने पहिली यादी १८ जानेवारीला घोषित केली होती. यामध्ये काँग्रेसने एकूण ५४ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० : काँग्रेसची पहिली यादी जाहीर
त्यामुळे आता काँग्रेसने एकूण ७० पैकी ६६ उमेदवारांची नावं घोषित केली आहेत.
दरम्यान आपने पहिल्याच यादीत आपल्या ७० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : आपच्या 70 उमेदवारांची यादी जाहीर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा
दिल्लीत एकूण ७० जागांसाठी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.
दिल्लीत एकूण २६८९ ठिकाणी १३ हजार ७५० मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दिल्लीत एकूण १ कोटी ४६ लाख मतदार आहेत.
विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला संपत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.