सुनेची चौकशी, सासूची चिडचिड; पनामा प्रकरणी ऐश्वर्याची चौकशी

सुनेची चौकशी, सासूची चिडचिड; पनामा प्रकरणी ऐश्वर्याची चौकशी

‘पनामा पेपर्स लीक’प्रकरणी आता बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणी ईडीने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला समन्स बजावले असून पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला हे समन्स बजावण्यात आले आहेत. त्यामुळे नोटीशीला उत्तर देण्यासाठी ऐश्वर्या राय नवी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाली. ईडी कार्यालयात ऐश्वर्याची दोन तास चौकशी करण्यात आली, मात्र ऐश्वर्याच्या चौकशीमुळे ऐश्वर्याची सासू खासदार जया बच्चन राज्यसभेत आक्रमक झाल्या.

ऐश्वर्याची सासू जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभा सदस्य आहेत. स्वत:च्या सुनेला म्हणजेच ऐश्वर्या रायला चौकशीसाठी जावे लागल्यामुळे सासू जया बच्चनला भयंकर राग आला असून त्यांनी राज्यसभेत चिडचिड केली. ऐश्वर्याची सासू आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन या चौकशीवरून राज्यसभेत आक्रमक झाल्या. यावेळी सत्ताधारी नेते आणि जय बच्चान यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. ‘तुमचे वाईट दिवस लवकरच सुरू होतील’, असा इशाराही जया बच्चन यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

पनामा प्रकरण नेमकं काय?

पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील ५०० लोकांचा समावेश आहे. यामध्ये देशातील नेते, चित्रपट अभिनेते, खेळाडू, उद्योगतींची नावे आहेत. तसेच पनामा प्रकरणात प्रत्येक वर्गातील नामवंत व्यक्तींची नावे समोर आली आहेत. या सहभागी व्यक्तींवर करचुकवेगिरीचा आरोप आहे. त्यामुळे आता मागील दिवसांपासून पनामा प्रकरणाक ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version