‘दादा गटाला विलीन होण्याशिवाय पर्याय नाही’

‘दादा गटाला विलीन होण्याशिवाय पर्याय नाही’

मुंबई, ३ जुलै २०२३, प्रतिनिधी: राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी दुसरा महाभूकंप केला आहे. अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर जितेंद्र आव्हाडांनी भाष्य केले आहे.

अजित पवारांच्या फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही. त्यांच्याकडे फक्त विलीन होण्याचा पर्याय आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला.यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलेल्या निकालाचे दाखले देत अजित पवार यांच्या दाव्यातली हवा काढून टाकली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर तातडीने जितेंद्र आव्हाड बोलले. तसेच अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या चुकीच्या असल्याचा दावाही त्यांनी केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,

आताच काही जणांनी राष्ट्रवादी म्हणून पत्रकार परिषद घेतली. त्यात पंतप्रधान, प्रेसिडेंट अशा नियुक्त्या झाल्या. तिथे बसलेल्या सर्वांनी पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवारांचेच नाव घेतले. मग आता निवडणूक आयोगाने सांगितलेल्या नियमांनुसार पक्षातील सर्व अधिकार हे पक्षाध्यक्षांना असतात. यानुसारच पक्षाध्यक्ष हे एखाद्या सदस्याचे, पदाधिकाऱ्याचे सदस्यत्व निलंबित करू शकतात, त्याची हकालपट्टी करू शकतात.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की,

आता हे कालचे शरद पवारांचे पत्र पाहा. यात त्यांनीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कालच निलंबन केले आहे. त्यात म्हटले आहे की, पक्षाध्यक्षांपासून सर्व बाबी लपवून तुम्ही ९ आमदारांना पक्षापासून प्रवृत्त करत होते, यामुळे त्यांचे निलंबन केले आहे. आव्हाडांनी सवाल केला की, तुम्ही जर शरद पवारांना अध्यक्ष मानत असाल तर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंवरील कारवाई मान्य करणार की नाही? आणि जयंत पाटलांची नेमणूक खुद्द पवारांनीच केली आहे. ते जे एकजण मान्यवर असा उल्लेख करत होते त्यांनी त्यांचं नाव का घेतलं नाही? ते एकजण म्हणजेच शरद पवार आहेत. पक्षाच्या घटनेप्रमाणे पवार साहेबांनी कारवाई केली आहे. पवार साहेब अध्यक्ष असल्याचं स्वत: अजितदादांनी, पटेलांनी, भुजबळांनी तसेच तटकरेंनी मान्य केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version