Ind vs NZ T20 Final : नजर उतरवा…, लिंबू-मिरची फिरवा…, काहीही करा, पण इथे मॅच नको; क्रिकेटप्रेमींच्या भावना अनावर, का होतोयं हा स्टेडीयम इतका ट्रोल?

भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे.
Ind vs NZ T20 Final : नजर उतरवा…, लिंबू-मिरची फिरवा…, काहीही करा, पण इथे मॅच नको; क्रिकेटप्रेमींच्या भावना अनावर, का होतोयं हा स्टेडीयम इतका ट्रोल?

भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्या, 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरूद्ध न्युझिलंड हा T20 विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच क्रिकेटप्रेमींनी स्टेडीयमबाबतची भीती व्यक्त केली आहे. याच नरेंद्र मोदी स्टेडीयमवर भारताने 2023 साली विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. मात्र भारताला पराभव पत्करावा लागला. विश्वचषकात लागोपाठ सर्व सामने जिंकणारा भारतीय संघ नेमक्या अंमित सामन्यात पराभूत होतो, हे संपूर्ण देशवासियांच्या जिव्हारी लागले. इतकेच नव्हे तर गुजरातनेही आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल ट्रॉफी मिळवली. मात्र त्यानंतर गुजरातने इतकी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसून आले नाही. गेल्याच वर्षी बंगळुरूने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. परंतू, त्यानंतर चेन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या चेंगराचेंगरीत काही नागरिकांना जीव गमवावा लागला. असे एक ना अनेक उदाहरणं देत क्रिकेटप्रेमींनी या स्टेडीयमला पनवती म्हटलं आहे. अशा आशयाचे अनेक इंस्टा पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

पाहुयात काही मजेदार व्हिडीओ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version