कोथिंबिरीच्या भावात घसरण, शेतकरी हवालदिल 

नाशिक जिल्ह्यातील बहुतेक भागात वरच्या पावसावर कोथिंबीरीचे पीक घेतले जाते. मात्र, सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबीरीला साधारण १००० ते १५०० रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघावयास मिळत आहे.
कोथिंबिरीच्या भावात घसरण, शेतकरी हवालदिल 

८ ऑगस्ट, २०२४, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बहुतेक भागात वरच्या पावसावर कोथिंबीरीचे पीक घेतले जाते. मात्र, सध्या नाशिक मंडीमध्ये कोथिंबीरीला साधारण १००० ते १५०० रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघावयास मिळत आहे. सध्या मजुरीचे दर हे तीनशे रुपये रोज आहेत. तसेच, भाजीपाला नेण्यासाठी वाहतूकीचे दर हजार ते पंधराशे रुपये असे आहेत. मात्र, कोथिंबीरीला तेवढेच पैशाचे दर मिळत असल्याने चांदवड तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version