मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू

मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू

राज्यात आज कोरोनाची लागण झालेल्या एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा राज्यातला आत्तापर्यंतचा दुसरा कोरोनामुळे झालेला मृत्यू मानण्यात येत असला, तरी हा मृत्यू कोरोनामुळेच झालाय का, याबाबत अद्याप सुस्पष्टता नाही. मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे.  याआधी वाशीत एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या बळींची संख्या ५ वर गेली आहे.

आत्तापर्यंत कोरोनाचे उपचार घेणाऱ्या १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या १२५ वर गेली आहे. कालच २ रुग्णांना उपचारांती सोडून दिलं होतं. हे दोघेजण कोरोनाची लागण झालेलं पहिलं दाम्पत्य होतं. त्यांच्यावर पुण्याच्या नायडू रुग्णालयात उफचार झाले होते.  

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. सामाजिक अंतर हाच यावरचा उपाय असल्याचं सांगण्यात येतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version